अजय देवगन, संजय दत्तचा चित्रपट मांसाहार जेवणामुळे गेला डब्यात

अजय देवगन, संजय दत्तचा चित्रपट मांसाहार जेवणामुळे गेला डब्यात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून बॉलिवूडला ओळखले जाते. येथे दरवर्षी जवळपास ५०० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली जाते. यातील जवळजवळ प्रत्येक सिनेमा हा तयार होतो, पण काही चित्रपट विविध कारणांनी डब्यात सुद्धा जातात. अर्थात त्यांची निर्मिती होत नाही असे चित्रपट रखडले जातात किंवा कायमचे बंद पडतात.

चित्रपट बंद पडण्याची विविध कारणे असतात जसे की, निर्मात्या कडून अपुर पतपुरवठा, कलाकारांच्या तारखा, लोकेशनच्या अडचणी, वादग्रस्त विषय. पण बॉलीवूडचे आघाडीचे कलाकार अभिनेता संजय दत्त व अभिनेता अजय देवगन (ajay devgan and sanjay dutt) यांचा एक सिनेमा मांसाहार जेवणाच्या वादामुळे बंद पडला आहे. बघा सिनेमाच्या निर्मिती कोणत्याही कारणांनी बंद पडून शकते आणि तो सिनेमा डब्यात जावू शकतो. नेमका काय आहे हा किस्सा आणि असं काय घडलं होतं?

दिग्दर्शक मिलन लुथरिया आणि बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन (ajay devgan and sanjay dutt) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'कच्चे धागे', 'चोरी चोरी', 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' आणि 'बादशाहो' असे अनेक सुपरहिट चित्रपट या जोडीने दिले आहेत. मिलन आणि अजय दोघेही खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत. दोघेही "बीहड" नावाच्या चित्रपटात काम करत होते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. पण काही कारणांमुळे या चित्रपट डब्यात बंद झाला आणि हा चित्रपट बनलाच नाही.

संजय दत्तही अजय देवगणसोबत (ajay devgan and sanjay dutt) "बीहड" या चित्रपटात दिसणार होता. मध्य प्रदेश आणि चंबळमध्ये याचे शूटिंग होणार होते. हा चित्रपट नायक विरुद्ध खलनायक असा आधारित होता. ज्या मध्ये पोलीस आणि डाकू यांच्यातील संघर्षाची गोष्ट सांगितली जाणार होती. ८० च्या दशकातला चॉकलेट हिरो कुमार गौरव आणि बंटी वालिया यांच्यासह बबलू पचिसिया या चित्रपटाची निर्मिती करणार होते. अजय देवगण आणि संजय दत्त सारख्या बड्या स्टार्सना समोरासमोर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.

"बीहड" चित्रपटाची (ajay devgan and sanjay dutt) पटकथा तयार होती, कास्टिंगपासून ते निर्माते आणि शूटिंग लोकेशनपर्यंतच्या सर्व आघाड्यांवरील संपूर्ण मोठी तयारी पूर्ण करण्यात आली होती. पण नंतर अचानक हा चित्रपट डब्यात गेला. हा चित्रपट रखडण्याचे खरे कारण काय आहे हे कोणालाच माहीत नाही, पण यामागे एक हास्यास्पद कारण मात्र नक्की सांगितले जाते.

हा चित्रपट डब्यात जाण्याचे एक कारण म्हणजे निर्माता बबलू पचिसिया असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी आलेल्या माध्यामांतील ज्या बातम्या आल्या होत्या त्यावर विश्वास ठेवायचा झाला तर बबलू पचिसिया हे संपूर्ण शाकाहारी व्यक्ती. मांसाहाराबाबत ते खूप कडक असायचे. असे म्हटले जाते की ते कोणालाही त्यांच्या कार्यालयात मांसाहार आणू देत नसत. पण एके दिवशी असं काही घडलं की बबलू पचिसियाला यांना त्यांचा राग अनावर झाला. ते चित्रपट दिग्दर्शक मिलन लुथरियावर इतके संतापले की प्रकरण हाताबाहेर गेले आणि चित्रपट डब्यात गेला.

त्याचं झालं असं की, मिलन लुथरिया चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामाच्या संदर्भात बबलू पचिसियाला यांना भेटायला आले होते. जेवणाची वेळ झाली तेव्हा दिग्दर्शकांनी नॉनव्हेजची अर्थात मांसाहाराची ऑर्डर दिली आणि खायला सुरुवात केली. बबलू पचिसिया आले आणि त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज जेवण आणले गेल्याचे पाहिल्यावर त्यांना प्रचंड राग आला. ऑफिसच्या संपूर्ण टीमसमोर निर्माते पचिसिया हे दिग्दर्शक मिलनवर ओरडले. पुढे दोघांमध्ये मोठे बाचाबाची झाली. या एका छोट्या गोष्टीवरून अखेर निर्माते पचिसिया यांनी हा चित्रपट न बनविण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपट अखेर डब्यात गेला. या घटनेबाबत सर्वांना माहित आहे पण, दोघांनीही कधीही माध्यमांसमोर याची कबुली दिली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news