दसवी : अभिषेक बनला अशिक्षित नेता

दसवी : अभिषेक बनला अशिक्षित नेता
Published on
Updated on

नवी दिल्ली :

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन दीर्घ कालावधीनंतर येणार्‍या आपल्या आगामी चित्रपटावरून जोरदार चर्चेत आहे. त्याच्या 'दसवी' या चित्रपटाची सिनेप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च रोजी रीलिज होणार आहे. यासंदर्भात अभिषेकने आपली को-स्टार यामी गौतमीचा एक लूक शेअर केला आहे. तर यामीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'दसवी'तील आपला लूक शेअर केला आहे. यामध्ये ती एका कडक महिला पोलिस अधिकार्‍याच्या वेशात दिसत आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक व यामी गौतमीसोबत निमरत कौरही मुख्य भूमिकेत आहे. निमरतने दसवीमध्ये विमलादेवीची तर अभिषेकने अशिक्षित नेता गंगाराम, तर यामीने एक आयपीएस अधिकार्‍याची भूमिका केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news