

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अभिनयासोबत उत्तम नृत्यांगना आहे. ती आपले हटके फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या असाच एक जुना व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत धकधक गर्लचा पती श्रीराम नेने यांचा 'तम्मा-तम्मा' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला.
माधुरी दीक्षित पती श्रीराम नेने यांच्या वाढदिवसाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यात माधुरी आपल्या पतीसोबत 'ठाणेदार' चित्रपटातील 'तम्मा-तम्मा' या प्रसिद्ध गाण्यावर थिरकली. यावेळी माधुरी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर श्रीराम नेने हे निळ्या रंगाच्या शर्टसह पॅन्टमध्ये दिसतात. यावेळी दोघांसोबत बॉलिवूडचे दिग्गज स्टार्सदेखील उपस्थित होते. हा व्हिडिओ एका पार्टीचा आहे.
हा व्हिडिओ संजय कपूर यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये '९० के दशक में वापस, क्या रात है'. असे म्हटले आहे. या पार्टीत तिने संजय कपूरसोबत 'अँखियां मिलाऊं' या गाण्यावर डान्सही केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यासह अनेक बॉलिवूड स्टार्संनी कॉमेन्टस केल्या आहेत.
श्रीराम नेने हे स्वयंपाकात निष्णात आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. पहिल्यांदाच श्रीराम नेने यांनी डान्स करताना दिसले आहेत. माधुरीने आपल्या सौंदर्यासोबत अभिनयाने चाहत्याच्या मनात आजही घर केले आहे. याशिवाय माधुरीने नुकतेच इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या डेमिनमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Subtle statements! ?'असे लिहिले आहे.
धकधक गर्ल माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी श्रीराम नेनेसोबत विवाह बंधनात अडकली. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत शिफ्ट झाली. नेने हे हार्ट सर्जन आहेत.
हेही वाचलंत का?