सांगली : जिल्हा परिषदेत फाईल ट्रॅकिंग यंत्रणा | पुढारी

सांगली : जिल्हा परिषदेत फाईल ट्रॅकिंग यंत्रणा

सांगली पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत ई-फाईल ट्रॅकिंग टपाल मॉनिटरिंग सिस्टिम (एमटीएमएस) ही यंत्रणा तयार केली आहे. दि. 1 एप्रिलपासून ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आणि सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.

डुडी म्हणाले, जिल्हा परिषदेत येणार्‍या प्रत्येक माणसाचे काम वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे. आलेल्या अर्जाची बिनचूक नोंद होऊन वेळेत कार्यवाही होण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहुल गावडे यांनी एफटीएमएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

अर्जदाराने जिल्हा परिषदेत कोणत्याही विभागात सादर केलेल्या अर्जाची एफटीएमएस या सिस्टीममध्ये नोंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात हा अर्ज स्वीकारल्यानंंतर टपाल आवक विभागातील संबंधित प्रक्रिया पूर्ण करून संबधित विभागाकडे अर्ज पाठवतील. त्यानंतर संबधित अर्जदारास मोबाईल मेसेज जाईल.

त्या मेसेजमध्ये एक लिंक शेअर केलेली असेल. संबंधित अर्जदाराने त्या लिंकवर क्लिक केल्यास सिस्टिम ओपन होईल. अर्जदाराचा अर्ज कुठे आहे, कोणत्या टेबलवर किती दिवस अर्ज व फाईल आहे ते समजणार आहे. त्यांच्याशी संपर्क साधू शकणार
आहेत.

त्यामुळे कामाला गती मिळणार आहे. कर्मचार्‍यांनाही प्रत्येक महिन्याच्या कामाची माहिती सादर करण्याच्या कामातील त्रास कमी होणार आहे. फाईल ई-ट्रॅकिंग यंत्रणेमुळे लोकांची कामे गतीने होतील, तसेच हेलपाटे कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button