पुणे : सुपे गावात मनुष्यवस्तीनजीक रानगव्यांचा वावर! | पुढारी

पुणे : सुपे गावात मनुष्यवस्तीनजीक रानगव्यांचा वावर!

सुपे : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुक्यातील सुपे गावानजीक काळखैरेवाडीच्या सुपे खैरेपडळ रस्त्यावर जुन्या शासकीय विश्रामगृहा(डाकबंगला) समोर मनुष्यवस्ती लगत अचानक चार रानगवे आढळल्याने सुपे व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

RUSSIA-UKRAINE WAR : रशियाच्‍या हवाई हल्‍ल्‍यात युक्रेनमधील रासायनिक प्रकल्‍पाचे मोठे नुकसान, अमोनिया गॅस गळतीमुळे नागरिकांना भूमिगत होण्‍याचे आवाहन

या अगोदर पुणे ,सांगली कोल्हापूर ,परिसरात मनुष्यवस्तीत रानगवे आढळले होते. पश्चिम घाटामध्ये रानगव्यांची संख्या जास्त आहे; मात्र म्हशी सारखा दिसणारा रानगवा प्राणी बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील सुपे भागात दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे चार रानगवे समूहाने रस्ता दिसेल तिकडे धावत होते आणि हे रानगवे पाहण्यासाठी सुपे भागातील ग्रामस्थ व युवकांनी गर्दी केली होती. तर काहींनी फोटो व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला.

COVID-19 update : भारताची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, पण अद्याप धोका पुर्णत: टळलेला नाही

प्लॉटिंग केलेल्या जागेच्या काटेरी कुंपणावरूनही हे रानगवे उड्या मारत होते. त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढल्याने हे रानगवे रस्ता ओलांडून सुपे मोरगाव रस्त्यालगतच्या लोणकर फार्ममधील डाळिंब बागेत शिरले व त्यानंतर मयुरेश्वर अभयारण्यालगतच्या ऊसाच्या शेतात शिरले . या ऊसाच्या शेतालगत वन कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Bhagavad Gita : कर्नाटकातील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकवले जाणार नाहीत; कर्नाटक सरकारने बदलली भूमिका

बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की रानगवा हा प्राणी अत्यंत लाजाळू असतो तो कोणावरही हल्ला करणार नाही त्यांना परिसरातील नागरिकांनी त्रास देऊ नये किंवा इजा करू नये. तो आपोआप मनुष्य वस्तीतून निघून जाईल. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये.

भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत यांची गुहागर मतदारसंघातून आमदार होण्याची इच्छा

Back to top button