मिरज: प्रेमसंबंधाच्या संशयातून नरवाडमध्ये एकास मारहाण

बॅंक अधिकाऱ्याला मारहाण
बॅंक अधिकाऱ्याला मारहाण
Published on
Updated on

मिरज पुढारी वृत्तसेवा : नरवाड (ता. मिरज) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून विरुपाक्ष बाळकृष्ण भंडारे यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विरुपाक्ष भंडारे यांनी राजू पांडुरंग भंडारे (रा. नरवाड) याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विरुपाक्ष भंडारे हे शुक्रवार, दि. 18 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारासघराजवळ असलेल्या माळावर गेले होते. त्यावेळी राजू भंडारे हा त्या ठिकाणी आला.

त्याने विरुपाक्ष यांना "तुझे कोणाशी प्रेमसंबंध आहेत, तू का सारखा – सारखा इकडे येतोस", असे म्हटले. त्यावेळी विरुपाक्ष यांनी "माझे तसे काही नाही", असे सांगितल्याने दोघांत जोरदार वादावादी झाली. त्यावेळी राजू याने विरुपाक्ष यांना काठीने बेदम मारहाण
केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news