IPL 2022 हंगामाच्या सुरूवातीआधीच लखनौला मोठा धक्का! | पुढारी

IPL 2022 हंगामाच्या सुरूवातीआधीच लखनौला मोठा धक्का!

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण भारतात सध्या आयपीएलचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. आयपीएल स्पर्धेचा १५ हंगाम सुरू होण्यास आता फक्त काही दिवस उरले आहेत. या हंगामातील पहिला सामना २६ मार्च रोजी गतवर्षीचे विजयी शिलेदार चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.(IPL 2022)

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच लखनौ सुपर जायटंस सहभागी होत आहे. लखनौ संघ पहिल्याच हंगामात खेळण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. लखनौ संघाच्या कर्णधार पदाची धुरा के. एल. राहुल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. हंगामासाठी जोरदार तयारी करत असताना लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. (IPL 2022)

इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूड यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौकडून खेळणार होता. इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दरम्यान वूड जखमी झाला होता. या दुखापतीमुळे तो दुसऱ्या टेस्टमधूनही बाहेर आहे. वूड पुढील आठवड्यात इंग्लंडला परतणार आहे. तो उर्वरित वेस्ट इंडिज सीरिज आणि आयपीएस स्पर्धेत खेळणार नाही, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केले आहे.

 

असा असेल लखनौ सुपर जायंट्सचा संघ : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, रवी बिष्णोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा, अंकीत राजपूत, शाहबाज नदीम, मनन व्होरा, मोहसीन खान, आयुष बदोनी, कर्ण शर्मा, मयंक यादव, काईल मेयर्स, एव्हिन लुईस

 

Back to top button