South Actress : साऊथचं नव्हे तर हिंदीमध्येही या अभिनेत्रींनी चमकवलं नशीब | पुढारी

South Actress : साऊथचं नव्हे तर हिंदीमध्येही या अभिनेत्रींनी चमकवलं नशीब

पुढारी ऑनलाईन डेस्क

सामंथापासून पूजा हेगडेपर्यंत या अभिनेत्रींनी साऊथचं (South Actress) नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली प्रतिमा ओळख निर्माण केलीय. सामंथा रुथ प्रभू, पूजा हेगडे, राशी खन्ना आणि रेजिना कॅसॅंड्रा या साऊथच्य़ा (South Actress) अभिनेत्रींनी अलीकडच्या काळात हिंदी कलाविश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या साऊथचा सिनेमा पुष्पा तेजीत आहे. दक्षिणेतून येणाऱ्या चित्रपटाची कहाणी हिंदी कला विश्वातही आपल्याला पाहायला मिळतात. इतकचं नाही तर दक्षिणेतील अनेक दिग्गज स्टार्सही हिंदी चित्रपटसृष्टीत दस्तक देत आहेत. साऊथच्या या पुढील प्रसिध्द फेम अभिनेत्री आहेत, ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपला प्रतिमेचा शिक्का सोडला आहे. स्टार्स भाषेच्या पलीकडे जाऊन काम करत आहेत.

रेजिना कॅसॅंड्रा

रॉकेट बॉईजमधील मृणालिनी साराभाईच्या भूमिकेत रेजिना कॅसॅंड्राने सर्वांना प्रभावित केले. हा शो रिलीज झाल्यानंतर चाहते त्याच्या पुढील हिंदी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. ती आता शाहिद कपूर स्टारर राज आणि डीकेच्या ‘फेक’मध्ये दिसणार आहे.

सामंथा रुथ प्रभू

प्रभु राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिली मॅन’ मधील उत्कृष्ट अभिनयानंतर सामंथा रुथ देशभरात लोकप्रिय झाली.

राशी खन्ना

‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’चे खूप कौतुक झाले आणि राशी खन्नाची भूमिकाही आवडली. ती रुद्र या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत दिसणार आहे.

पूजा हेगडे

पूजा हेगडेने ऋतिक रोशनसोबत मोहेंजोदारो हा चित्रपट केला. या चित्रपटानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. प्रभावी अभिनयामुळे साऊथच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. मोहेंजोदारोनंतर तिने अक्षय कुमारसोबत हाऊसफुल्ल ४ चित्रपट केला होता. आता तिचा प्रभाससोबत राधेश्याम चित्रपट येतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

Back to top button