गंगूबाईच्या यशानंतर आलिया भट्टनं मन भरून खाल्लं बर्गर, प्रियांका म्हणाली... | पुढारी

गंगूबाईच्या यशानंतर आलिया भट्टनं मन भरून खाल्लं बर्गर, प्रियांका म्हणाली...

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. काहीच दिवसांत ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला. भरघोष मिळालेल्या यशाबद्दल आलियाने सध्या एका छोट्या पार्टीचे आयोजन करत मन भरून बर्गर खाल्लं आहे. याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलियाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या पोटोत तिच्या एका हातात बर्गर आणि दुसऱ्या हातात फ्रेंच फ्राईज घेतल्याचे दिसत आहे. यासोबत तिच्या चेहऱ्यावर चित्रपटाने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद दिसत आहे. यावेळी तिने ब्लॅक रंगाच्या जॅकेटसोबत शर्ट परिधान केला होता.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ”गंगूबाई काठियावाडी’ १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल शुभेच्छा. शाकाहारी बर्गर. आलियाला फ्राय 🙃💯, सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद 🤍🌙.’ असे लिहिले आहे. या चित्रपटाने मिळवलेल्या यश आपल्या खास पद्धतीने सेलिब्रेट करत तिची हटके स्टाईल पाहायला मिळाली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासोबत बॉलिवूड स्टार्संनी कॉमेन्टस करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद 🤍🌙Woohoooo!!! 💥 स्मॅशिंग आणि हाऊ फेलो फिश!!!💜.’, तर प्रियांका चोप्राने तिचे अभिनंदन करत ‘yum yum’ असे म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने ‘😍🍔 NOMNOMNOM’, असे लिहिले आहे. तर याच दरम्यान लेखक जय शेट्टी आणि कलिका गोयलसह अनेक चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट एकामागून एक चित्रपटाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. सध्या ती ‘रॉकी आणि राणीच्या प्रेम कहाणी’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंह असणार आहे, तर ‘RRR’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामुळेही ती चर्चेत आहे. एवढेच नाही तर आलिया आता हॉलिवूड चित्रपटांमध्येही पदार्पण करणार आहे. चाहते तिच्या हॉलिवूड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Back to top button