भंडारा : खड्डा चुकवताना दुचाकीला अपघात, महिलेचा मृत्यू | पुढारी

भंडारा : खड्डा चुकवताना दुचाकीला अपघात, महिलेचा मृत्यू

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : खड्डयात दुचाकी आदळून खाली पडल्याने (accident) गंभीर झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी पांढराबोडी येथील रस्त्यावर घडली. ललिता तेजराम भूरे (वय ४१, रा. पांढराबोडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

ललिता या पतीसोबत दुचाकीने भंडाऱ्याकडे येत होत्या. पांढराबोडी ते भंडारा या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी खड्डयात जाऊन आदळली. यात ललिता या दुचाकीवरुन खाली पडल्याने (accident) त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तेजराम भूरे यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ : असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी | Anil eye care Hospital

Back to top button