३५ वर्षीय श्रद्धा कपूरच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहून विश्वास बसणार नाही ! | पुढारी

३५ वर्षीय श्रद्धा कपूरच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहून विश्वास बसणार नाही !

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या अभिनयासोबत तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. श्रद्धा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाचा आज ३ मार्चला ३५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त बॉलिवूडला सुपहिट चित्रपट देणाऱ्या श्रद्धाची कमाई किती आहे? याविषयी माहिती घेवूयात….

श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor)  एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्रीसोबत ती एक उत्तम गायिकाही आहे. आतापर्यत तिने अनेक हिट चित्रपटातून लाखो रुपये कमवले आहेत. चित्रपटातील अभिनयासोबत तिने अनेक जाहिराती आणि काही टीव्हीशो मधूनही कमाई केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर फॅन फॉलोविंगही जास्त आहे. या सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी लाखो रुपये घेते. नुकतेच तिच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरची ५७ कोटींची मालकीण आहे. म्हणजे, तिच्याकडे एकूण मालमत्ता ५७ कोटी रुपयांची आहे. तिचा मासिक उत्पन्न ५० लाखांहून अधिक तर वार्षिक पगार ६ कोटींहून अधिक आहे.

मुंबईतील जुहूमध्ये एक आलिशान बंगला असून त्याची किंमत काेट्यवधी रुपये आहे. ही सी फेसिंग (Sea Facing) प्रॉपर्टी आहे. या घराच्या फर्निचरपासून ते भिंतीपर्यंत सर्व काही विंटेज लूकमध्ये आहेत.

श्रद्धाने बॉलिवूड करिअरची सुरुवात २०१० मधील ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात श्रद्धाला खूप छोटी भूमिका मिळाली होती. ‘आशिकी २’ या चित्रपटातून ती प्रकाश झोतात आली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत तिने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय श्रद्धा लव रंजन याच्या आगामी ‘अनटाइटल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूरही दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button