विजय सेतुपती, समंथा, नयनताराचा रॉमकॉम

विजय सेतुपती, समंथा, नयनताराचा रॉमकॉम

Published on

पुढारी ऑनलाईन

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आजकाल चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी तिच्या चित्रपट, आयटम साँगमुळे. सध्या समंथाचा फोकस तिच्या करिअरवर असलेला दिसतो. ती झपाट्याने तिचे प्रोजेक्ट पूर्ण करत असते आणि मग एखाद्या ठिकाणी पर्यटनाला निघून जाते. सध्या समंथा चर्चेत आलीय तिच्या नव्या चित्रपटामुळे. समंथाचा आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या दोघी आगामी 'काथु वकुला रेंडू कधल' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. यात दोघींचा नायक आहे साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती. हा फोटो याच चित्रपटाच्या सेटवरील आहे. नयनतारा सोशल मीडियात सक्रिय नाहीय, पण तिची फॅन फॉलोविंग काही कमी नाही. त्यामुळेच दोन्ही अभिनेत्रींच्या चाहत्यांच्या या फोटोवर उड्या पडल्या आहेत. हा चित्रपट 28 एप्रिलला रीलिज होत आहे. विजय सेतुपती आणि समंथा या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news