Vikram Vedha : सैफ अली खानचा फर्स्ट लूक, करिना कपूर म्हणाली, ‘पती पहिल्यापेक्षा हॉट’ | पुढारी

Vikram Vedha : सैफ अली खानचा फर्स्ट लूक, करिना कपूर म्हणाली, 'पती पहिल्यापेक्षा हॉट'

पुढारी ऑनलाईन ; बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी ‘विक्रम वेधा’ ( Vikram Vedha ) या चित्रपटातील अभिनेता सैफ अली खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या पहिला लूक सोशल मीडियावर शेअर होताच सैफची पत्नी करिना कपूरने पतीचे कौतुक करत चित्रपटाची प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले आहे. तर निर्मात्यानी या चित्रपटाची रिलीज डेटचे घोषणा केली आहे.

हृतिकने नुकतेच सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ ( Vikram Vedha ) चित्रपटातील पहिला फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सैफ अली खान पांढऱ्या रंगाच्या पोलो टीशर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये जबरदस्त दिसत आहे. यासोबतच सैफच्या एका हातात घड्याळ तर त्याच्या डोळ्यावर चष्मा असल्याचे दिसते. हृतिकच्या आगामी ‘विक्रम वेधा’ चित्रपटाची गेल्या वर्षापासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. याच दरम्यान त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये हृतिकने लिहिले आहे की, ”विक्रम’. एका प्रसिद्ध अभिनेता आणि सहकाऱ्यासोबत काम करायला मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी अनेक वर्षांपासून प्रशंसा केली आहे, चित्रपटातील अनुभव मला नेहमीच आवडेल आहेत. आता प्रतीक्षा करू शकत नाही!.’ यासोबतच निर्मात्यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपट रिलीज होणार असल्याची घोषणा केली. याच दरम्यान सैफ अली खानचा लूक पाहून त्याची पत्नी करीना कपूरने ‘पहिल्यापेक्षा सैफ खूपच हॉट दिसत आहे. त्यामुळे मी या चित्रपटाची वाट पाहू शकत नाही’ असे म्हटले आहे.

सैफ अली खानने एका मुलाखतीत विक्रम या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले होते की, ‘विक्रम हा एक अतिशय मजबूत, यशस्वी आणि हुशार आयपीएस अधिकारी आहे. तो खूप गतिशील आणि शक्तिशाली आहे.

या चित्रपटात हृतिकने ‘वेधा’ आणि सैफने ‘विक्रम’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन खलनायक तर सैफ अली खान हिरो असणार आहे. हे दोन स्टार्स पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत. हा चित्रपट साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘विक्रम वेधा’ चा हिंदी रिमेक आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

Back to top button