पुण्यात उभारणार ‘उत्पादन शुल्क’ची भव्य इमारत | पुढारी

पुण्यात उभारणार ‘उत्पादन शुल्क’ची भव्य इमारत

शिवाजी शिंदे

पुणे : राज्याला सर्वाधिक महसूल देणार्‍या उत्पादन शुल्क विभागाला उशिरा का होईना हक्काची जागा मिळाली आहे. एक एकराच्या प्रशस्त जागेत भव्य अशी राज्यातील पहिली दहा मजली इमारत पुण्यात उभी राहत आहे. कार्यालयाच्या आवारातच अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने असल्याने कुठल्याच कारवाईला विलंब होणार नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Russia-Ukraine war Live Updates : रशियाची ५ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडली, युक्रेनचा दावा

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे शहर तसेच विभागीय कार्यालय येरवडा येथे आहे. या दोन्ही विभागांच्या इमारतीसाठी जागा मिळत नव्हती. हक्काच्या इमारतीसाठी अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर शासनाने मंगळवार पेठेतील वेलस्ली रोड येथे एक एकर जागा दिली आहे. 1916 पासूनच या जागेचा सातबारा त्यांच्या नावाचा नसल्याने हा विषय प्रलंबित होता.

ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा

आता मात्र ही जागा सातबारासह या विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. दहा मजली इमारत, गट 1 ते 5 पर्यंत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांची निवासस्थाने असणार आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाकडून निधीसह मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ही इमारत उभी राहू शकते.

नबाव मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंत्र्यांचे आंदोलन

या विभागाचे शहर जिल्हा अधीक्षक, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांचे उपायुक्त यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये प्रस्तावित आहेत. सध्या पुणे स्टेशन येथे असलेल्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या जागेवर नवीन इमारत उभारली जाणार आहे.
                                                                                         – प्रसाद सुर्वे, उपायुक्त

Back to top button