पुष्‍पा : दक्षायणी कोण आहे? जिने नवऱ्याचा ब्लेडने कापला होता गळा

anasuya bharadwaj aka dakshayani
anasuya bharadwaj aka dakshayani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

'पुष्‍पा: द राईज' चा सगळीकडेच बोलबाला आहे. या चित्रपटातील एकापेक्षा एक तगड्या कलाकारांनी दमदार अभिनय करून प्रत्येकाच्या मनावर आपली छाप सोडलीय. अल्‍लू अर्जुनच्या या चित्रपटामध्ये दक्षायणी हिच्यावर सर्वांचीच नजर असेल. हीच ती दक्षायणी जिने आपल्या भावाच्या हत्येनंतर आपल्याचं नवऱ्याचा ब्लेडने गळा चिरला होता. तुम्हाला माहितीये का, ही अभिनेत्री कोण आहे? ही अभिनेत्री आहे -अनसूया भारद्वाज.

अल्‍लू अर्जुनच्या 'पुष्‍पा: द राइज'चा जादू सर्वांवरचं आहे. सोशल मीडियावरदेखील या चित्रपटातील संवाद, गाणी, इन्स्टा रिल्स व्हायरल होत आहेत. 'फ्लावर समझी क्‍या, फायर है मैं' असे म्हणत नेटकरी पुष्पातील डायलॉग्ज सोशल मीडियावर आणत आहेत.

चित्रपटात एक नाही तर अनेक खलनायक आहेत. मग ती आयपीएस भंवर सिंह शेखावत असो वा लाल चंदनचा कॉन्‍ट्रॅक्‍टर मंगलम श्रृणू. सोबत जॉली रेड्डीदेखील आहे. आता या सर्वांमध्ये एक भूमिका आहे ती म्हणजे दक्षायणी. ती मंगलम श्रृणुची पत्नी दाखवण्यात आलीय. तिला काहीच फरक पडत नाही ती, खुनामध्ये कुणाचं रक्त वाहतं. कुणाचा तरी गळा कापला जातोय आणि ही मात्र तोंडात पान चघळत ही भयानक बाई बिनधास्त आहे. पण, तिच्या रागाचा स्फोट मात्र कधी होईल, हे सांगता येत नाही. पुष्‍पा तिच्या भावाची हत्‍या करतो. आपल्या भावाला पुष्पाने मारल्याचा राग मनात धरती ती तिच्या नवऱ्याचा ब्लेडने गळा कापते.

'पुष्‍पा २' मध्ये अनसूयाची भूमिका नव्या अवतारात दिसेल. या चित्रपटात दोन चित्रपट आहेत. दक्षाची भूमिका कशी आहे, या सीनमधून स्पष्ट होतं. एक तो सीन जेव्हा पुष्‍पा श्रृणुला धमकी द्यायला त्याच्या घरी जातो. तेथे दक्षाचा भाऊ राज मोगलिस एकाला मारत असतो, त्याचा गळा चिरत असतो आणि तोंडात पान खात दक्षा नजरअंदाज करताना दिसते.

पुष्‍पाने तिच्या भावाची हत्‍या केलीय. आता दक्षाला बदला घ्यायचा आहे. ती नवरा श्रृणुशी नाराज आहे. त्यामुळे ती राग धरत त्याच्या छातीवर बसून ब्‍लेडने त्याचा गळा चिरते. एक लेडी विलेनचं इतकं बीभत्‍स रूप सिनेमाच्या पडद्यावर खूप कमी पाहायला मिळतं. पण, दाद द्यायला हवी. या भूमिकेला ती परफेक्ट आहे. अनसूया 'पुष्‍पा'मध्ये फारशी स्‍पॉटलाईटमध्ये नसूनही तिन आपली भूमिका जिवंत ठेवलीय.

कोण आहे Dakshayani?

चित्रपटामध्ये दक्षाची भूमिका साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अनसूया भारद्वाज आहे. चित्रपटामध्ये ती जितकी भयानक दाखवण्यात आलीय, खऱ्या आयुष्यात ती बोल्‍डही आहे.

अभिनेत्रीच नाही तर अँकर आणि होस्‍टदेखील

अनसूया चित्रपट आणि टीव्ही इंडस्‍ट्रीमध्ये मागील १९ वर्षांपासून काम करते. ती केवळ अभिनयचं नाही तर अँकर आणि होस्‍ट म्हणून काम करते. अनसूयाला तिच्या दमदार परफॉर्मन्ससाठी दोन वेळा फिल्‍मफेयर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलंय. ती दो वेळा SIIMA ॲवॉर्ड्स देखील आपल्या नावे केला आहे.

आधी हे करत होती काम

अनसूयाचा जन्‍म १५ मे, १९८५ रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्य़े झाला. ती ३६ वर्षांची आहे. अनसूया २००३ मध्ये 'नागा' चित्रपटामध्ये एका म्‍युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. ती २०१६ मध्ये अभिनय विश्वात आली. २००८ मध्ये तिने आपली एमबीएची पदवी पूर्ण केली. काही काळ एचआर एक्झुक्‍युटिव्ह म्हणून ती एका कंपनीत कामदेखील करू लागली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. नंतर साक्षी टीव्हीसाठी तिने अँकरींगदेखील केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Naidu (@gaurinaidu)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news