संजय राऊतांनी माझ्याच जोड्याने मला मारावे, किरीट सोमय्या यांचे प्रतिआव्हान | पुढारी

संजय राऊतांनी माझ्याच जोड्याने मला मारावे, किरीट सोमय्या यांचे प्रतिआव्हान

मुंबई; पुढारी ऑनलाईन

किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता. निकॉन इन्फास्ट्रक्चर कंपनी किरीट सोमय्यांची मुलाची आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केली होती. किरीट सोमय्या ईडी कार्यालयात खिचडी खात बसलेला असतो. किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहेत. भाजपचे लोक ईडीचे वसुली एजंट बनलेत, असा आरोपही त्यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले. आम्ही एका दमडीची चूक केलेली नाही. आम्हाला जेलमध्ये टाकायचे असेल तर खुशाल टाका, असे प्रतिआव्हान सोमय्यांनी दिले आहे.

संजय राऊत ईडी चौकशीसाठी का गेले नाहीत? असा सवाल पीएमसी घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांनी केला आहे. राकेश वाधवानशी आमचा संबंध नाही, असा खुलासाही त्यांनी केला. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा मी घाबरणार नाही. माझी चौकशी करावी. आम्ही अपील करणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

संजय राऊत तुम्ही जोड्यांनी कुणाला मारणार आहात. माझा जोडा संजय राऊतांना देतो त्यांनी मला मारावे, असे म्हणत सोमय्यांनी पत्रकार परिषदेत स्वतःच्या पायातील चप्पल काढून दाखवली. कोविड घोटाळा उघडकीस येईल या भितीने मुख्यमंत्री ठाकरे आणि संजय राऊत घाबरले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. घोटाळ्यात नाव येऊ नये म्हणून संजय राऊत विषयाला वेगळे वळण लावत आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील १९ बंगल्यांच्या कर भरला. ३० जानेवारी २०१९ रोजी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी ग्रामपंचायतीला घरपट्टी भरण्याबाबत अर्ज केला होता. ग्रामपंचायतींने कर भरुन घेतला. याचा पुरावा माझ्याकडे आहे. १९ बंगले ठाकरेंचे नाहीत असे म्हणता तर ते कर का भरतात याचे उत्तर द्यावे, असा सवाल त्यांनी केला आहे. कोविड सेंटर आरोपींना अटक का करत नाही, असा सवालही त्यांनी केला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : संजय राऊत यांचा ED, CBI चौकशीवरून भाजपवर हल्लाबोल | भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Back to top button