लोहोणेर जळीतकांडातील आरोपींच्या कोठडीत वाढ ; प्रेयसीनेच पेटवले होते प्रियकराला | पुढारी

लोहोणेर जळीतकांडातील आरोपींच्या कोठडीत वाढ ; प्रेयसीनेच पेटवले होते प्रियकराला

देवळा : पुढारी वृत्तसेवा
लोहोणेर जळीतकांडातील तरुणाचा मृत्यू झाल्याने संशयित आरोपींवर आता खुनाचाही गुन्हा दाखल झाला आहे. पाचही जणांची पोलिस कोठडी मंगळवारी (दि.15) संपल्याने त्यांना पुन्हा कळवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली.

लोहोणेर येथील युवक गोरख बच्छाव याने आपले लग्न मोडल्याच्या रागातून पूर्वाश्रमीची प्रेयसी कल्याणी सोनवणे, तिचे वडील गोकुळ, आई निर्मला, भाऊ हेमंत व प्रसाद या पाच जणांनी शुक्रवारी (दि .11) लोहोणेरमध्ये त्याला गाठत त्याला पेटवून दिले होते. उपरोक्त संशयित आरोपींना देवळा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, 85 टक्के भाजलेल्या गोरखचे रविवारी (दि.14) रात्री 11 वाजेच्या सुमारास उपचार चालू असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात निधन झाले. यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (दि.15) त्यांना कळवण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button