

पुणे : पुढारी वृत्तसेवा
Itel या स्मार्टफोन ब्रँडने भारतीय बाजारपेठेत Itel इयरबडस् T1 आणि Itel N53 सह दोन वायरलेस ऑडिओ उत्पादने सादर केली आहेत. Itel ने दावा केला आहे की, हे इयरबडसमध्ये 10.4mm ड्रायव्हरसह सुपर बास आहे. यात एका चार्जवर 8 तासांचा बॅकअप तर चार्जिंग केससह 40 तासांचा बॅकअप मिळणार आहे. या दोन्ही इअरफोन्समध्ये हाय-फाय ऑडिओ आणि 8 तास प्लेबॅकची सुविधा मिळेल. Itel इयरबडस् T1 च्या चार्जिंग केसमध्ये 350mAh बॅटरी देण्यात आली आहे. Itel इयरबडस् T1 मध्ये TWS सह कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ 5.0 आहे. यात कॉलिंग आणि म्युझिक प्ले, पॉजसाठी बटन असून व्हॉईस असिस्टंट देखील आहे. याचे वजन फक्त 3.7 ग्रॅम आहे. तसेच याला वॉटर रेझिस्टंटसाठी IPX5 रेटिंग मिळाले आहे. Itel इयरबडस् T1 हे पर्ल व्हाईट रंगात उपलब्ध आहेत. यासोबत एक वर्षाची वॉरंटी मिळेल आणि याची किंमत 1,099 रुपये आहे.
Itel Jukeset N53 हा नेकबँड स्टाइलचा वायरलेस इयरफोन आहे. याची किंमत फक्त 799 रुपये ठेवण्यात आली असून Jukeset N53 च्या बॅटरीबाबत 12 तासांच्या बॅकअप मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच याची स्टँडबाय वेळ 300 तास आहे. यात 150mAh बॅटरी आहे. याला वॉटर रेझिस्टंटसाठी IPX5 रेटिंग मिळाले आहे. तसेत एक वर्षाची वॉरंटीही मिळणार आहे.
हेही वाचलत का?