Madhubala Birth Anniversary : मधुबालाला कधीच खरं प्रेम मिळालं नाही

madhubala
madhubala

पुढारी ऑनलाईन डेस्क

नटखट अदा, सुंदर हास्‍याने भुरळ घालणारी अभिनेत्री मधुबाला. मधुबालाला (Madhubala) चार बहिणी. मोठी बहिण कनीज फातिमा, दुसरी बलसारा, तिसरी मधुबाला, धाकटी चंचल आणि पाचव्‍या क्रमांकाची शहिदा. मधुबाला (Madhubala) दिसायला खूप सुंदर. पण, नियतीच्या मनात मात्र वेगळचं होतं. आयुष्यभर देखण्या अभिनेत्यांसोबत चित्रपटांत तिने काम केले. अनेक अभिनेत्यांना तिच्या सौंदर्याची भूरळ होती. मात्र, तिला खरं प्रेम कधीचं मिळालं नाही. आज अभिनेत्री मधुबाला यांचा जन्मदिवस . त्यानिमित्त त्‍यांच्‍याविषयी थोडक्यात जाणून घ्या.

मधुबालाचे वडील अताऊल्‍ला खाँ. ते जुन्‍या दिल्‍लीत राहायचे. तेव्‍हा ते इंम्‍पिरिअल टोबॅको कंपनीमध्‍ये नोकरीला होते. परंतु, तंबाखूच्‍या कारखान्‍यात काम केल्‍यामुळे त्‍यांना त्रास झला. त्‍यामुळे त्‍यांची नोकरी सुटली. मधुचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम-देहलवी. तिचं बालपणापासूनच आकर्षक व्‍यक्‍तिमत्त्‍व. तिचं हासणं म्‍हणजे सुमधूर, सूरमय.

असे म्‍हटले जाते की, घरातल्‍या घरात बसून ती सोहराब मोदींच्‍या 'पुकार'मधले सीन करायची. हे तिच्‍या वडिलांनी पाहिलं आणि चित्रपटसृष्‍टीत तिचे नशीब आजमावण्‍यासाठी तिला मुंबईला घेऊन आले. ते मुंबईत स्‍टुडिओमध्‍ये मधुला काम मिळण्‍यासाठी चकरा मारायचे.

अखेर मधुबाला यांना एका चित्रपटात काम करायला मिळाले. बॉम्‍बे टॉकिजने १९४२ ला बसंत (मुमताज शांती, उल्‍हास) मध्‍ये बालतारका म्‍हणून त्‍यांना काम मिळालं. महिन्‍याला शंभर रुपये पगारही मिळाला. 'बसंत' हा चित्रपट अमिया चक्रवर्ती यांनी दिग्‍दर्शित केला होता. त्‍यात 'मेरे छोटे से मन की छोटी सी दुनिया रे' हे गाणे त्‍यांच्‍यावर चित्रित करण्‍यात आलं होतं.

'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणीला त्‍याचं काम आवडलं. संस्‍थेच्‍या ज्‍वारभाटासाठी त्‍यांनी मधुबाला यांना बोलावले. त्‍याचबराबेर, राजकपूरसोबत 'नीलकमल'मध्‍ये  मुख्‍य नायिका म्‍हणून काम द्‍यायचं असं त्‍यांनी ठरवलं होतं.

'ज्‍वारभाटा'मध्‍ये दिलीपकुमार (त्‍यांचा पहिला सिनेमा) व मधुबाला यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या.  बालकलाकार म्‍हणून त्‍या दिसणार होती. परंतु, काही कारणांमुळे देविका राणी यांनी मधुबाला यांना घेतले नाही. मात्र, सेटवरच दिलीपकुमार यांची मधुबाला यांच्‍याशी ओळख झाली. केदार शर्मा यांच्‍या 'नीलकमल'मध्‍ये राजकपूर नायक म्‍हणून दिसणार होते.

दार यांच्‍या पत्‍नी कमला चॅटर्जी या नायिकेची भूमिका साकारणार होत्‍या. आणि त्‍यांच्‍या लहानपणीची भूमिका मधुबाला साकारणार होती. कमला चॅटर्जी यांचे अकाली निधन झाले. त्‍यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबला. मधुबाला यांच्‍या वडिलांनी केदार यांना हा चित्रपट करायला लावला. या चित्रपटात मधुबाला यांना नायिका म्‍हणून घेण्‍याची विनंती केली. केदार यांनी ती मान्‍य केली.

केदार यांचा 'नीलकमल' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील राज कपूर आणि मधुबाला यांचा दमदार अभिनयाने दिग्‍दर्शक मोहन सिन्‍हांना मोहून टाकले. मोहन यांनी 'चितोड विजय' आणि 'दिल की रानी'मध्‍ये दोघांनाही संधी दिली. केदार यांनी मधुला 'नेकी और बंदी' चित्रपटात पुन्‍हा संधी दिली. यामध्‍ये केदार स्‍वत: नायक बनले. परंतु, हा चित्रपट चालला नाही.

'मुघल-ए-आझम'

१९६० च्या दशकात आला 'मुगल-ए-आझम.' त्यातील सलीमच्या विविध छटा दिलीपकुमार यांनी सुंदर साकारल्या. चित्रपटाचा नायक हा दिलीपकुमार असल्यामुळे सर्वसामान्य तरुणाप्रमाणे नायिकेसह प्रेमगीत किंवा तिच्यासाठी विरह गीत गाणार नाही, हे दिग्दर्शक के. असीफ यांनी पटवून दिल्यावर दिलीपकुमार यांनी गाण्याचा हट्ट बाजूला ठेवला होता. या चित्रपटामध्ये त्यांची नायिका होती मधुबाला. चित्रपट सुरू होताना नायिकेसाठी दिलीपकुमारनीच मधुबालाचं नाव के. असिफना सुचवलं होतं. या चित्रपटातील  'प्‍यार किया तो डरना क्‍या' हे गाणे मैलाचा दगड ठरलं.

१९५१ मध्‍ये मधु आणि दिलीपकुमार 'तराना'मध्‍ये एकत्र आले. मधुबाला यांना दिलीपकुमार आवडायचे. बी. आर. चोप्रा यांच्‍या 'नया दौर'मध्‍ये सुरुवातीला मधुबाला यांनाच घेणार होते. चित्रपटाचे एक शूटिंग सुरू होते. तेथे जाण्‍यास मधुबाला यांच्‍या वडिलांनी मज्‍जाव केला. त्‍यांनी चोप्रा यांना आपला नकार कळवला आणि 'नया दौर'साठी वैजयंतीमाला यांची निवड करण्‍यात आली. त्‍यावेळी 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ टिकट' या चित्रपटांमुळे मधुबाला या किशोरकुमार यांच्‍या सहवासात आल्‍या. त्‍यांनी १९६० मध्‍ये किशोरकुमार यांच्‍याशी लग्‍न केले.

'महल' आणि 'हावडा ब्रीज'

किशोरकुमार यांचा भाऊ अशोककुमार. अशोककुमार यांच्‍यासोबत मधुबाला यांनी 'महल' आणि 'हावडा ब्रीज' हे चित्रपट केले. ते तुफान गाजले. 'पराई आग' या चित्रपटाच्‍या सेटवर पहिल्‍यांदा मधुबालाने कमाल अमरोहींना पाहिले. तेव्‍हा ते संगीतकार गुलाम मोहम्‍मदशी बोलत उभे होते. कमालजींची उर्दूमिश्रित काव्‍यभाषा ऐकून मधुबाला प्रभावीत झाल्‍या हाेत्‍या.

महल हा चित्रपट कमाल यांनी दिग्‍दर्शित केला. मधुबालाच त्‍याची नायिका म्‍हणून त्‍यांना हवी होती. परंतु, काही जणांना ते मान्‍य नव्‍हते. त्‍यामुळे स्‍क्रिन टेस्‍ट घ्‍याचे ठरवले. मधुबाला यांनी या शूटनंतर सुरैय्‍याऐवजी मधुला घेण्‍यात आले. सुरैय्‍या त्‍यावेळी ४ हजार रुपये घेत होत्‍या. तरमधुबाला यांना  ७ हजार रुपये मानधन देण्‍यात आले हाेते.

हॉलिवूडमध्‍ये जाता आले नाही

संत, नीलकमल, दुलारी, बेकसूर, तरगना, अमर, मिस्‍टर ॲण्‍ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, हावडा ब्रीज, मुघल-ए-अआझम, असे एकापेक्षा एक चित्रपट मधुबाला यांनी सिनेइंडस्‍ट्रीला दिले. त्‍यांना हॉलिवूडमधूनही ऑफर आली होती. परंतु, त्‍यांच्‍या वडिलांनी नकार दिल्‍याने त्‍यांना हॉलिवूडमध्‍ये जाता आले नाही. नियतीने मधुबाला यांना खरे प्रेम मिळवून दिले नाही. 'आयेगा आनेवाला' अशी साद घालत त्‍यांनी जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news