अजय गोगावले याच्या स्वरांनी सजले “सुटले धागे”

अजय गोगावले याच्या स्वरांनी सजले “सुटले धागे”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

मराठी चित्रपटाचं गीत संगीत हे नेहमीच प्रेक्षकांना भावलं आहे. आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात गीतांना असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. अजय गोगावले या संगीत आणि गायकांचे नाव या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेले आहे. आता पुन्हा एकदा अजय 'सुटले धागे' हे नवीन गाणं आपल्या स्वरात घेऊन येत आहे.

'जिंदगानी' सामाजिक विषयावर केंद्रित आहे. चित्रपटाचं 'सुटले धागे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. सुटले धागे या गाण्यातून जिंदगानी चित्रपटातील 'सदा' या मुख्य पात्राच दुःख रेखाटलं आहे. हे गाणं प्रशांत मडपूवार याने लिहिलं असून विजय गवांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. सुटले धागे हे गाणं जरी या चित्रपटातील सदाचे दुःख चित्रित करत प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. मानवी भाव विश्वाचे चित्रण या गाण्याचे बोल मांडतात.

या चित्रपटाचं दिग्दर्शन विनायक साळवे यांनी केलं असून सदाच्या भूमिकेत ते चित्रपटात दिसणार आहेत. त्यासह शशांक शेंडे सुद्धा या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे. त्यांच्यासोबत वैष्णवी शिंदे ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहे. सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, प्रदीप नवले,संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती यांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाची निर्मिती या सुनीता शिंदे यांच्या नर्मदा सिनेव्हीजन्सची ही निर्मिती आहे. या चित्रपटाचं संकलन निलेश गावंड, संगीत विजय गवंडे यांनी केले आहेत. चित्रपटातील गाणी प्रशांत मडपूवार याने लिहिली आहेत तर आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे आणि अमिता घुगरी यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी सजली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news