Nora Fatehi : नोराने चाहत्यांना पिकनिकला येण्याची दिली भन्नाट ऑफर | पुढारी

Nora Fatehi : नोराने चाहत्यांना पिकनिकला येण्याची दिली भन्नाट ऑफर

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) गायक गुरु रंधावासोबतच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. तर सध्या नोरा नुकतीच कोरोनामुक्त होऊन सुट्टी एन्जॉय करण्याच्या मुडमध्ये दिसत आहे. यासाठी नोराने आपल्यासोबत ट्रिपला येण्याची ऑफर चाहत्यांना दिली आहे. सर्वांत बोल्ड, ब्युटीफूल अभिनेत्रीपैकी नोरा फतेही एक आहे. नोराला ‘नाच मेरी रानी’ या गाण्याच्या प्रमोशनवेळी कोरोनाची लागण झाली होती. यातून ती बरी झाली असून तिने आपल्या कामाला सुरूवात केली आहे. सध्या नोरा दुबईत कामासोबत सुट्टीच्या आनंद घेत आहे.

याच दरम्यान नोराने (Nora Fatehi) ब्लॅक रंगाच्या स्विमसूटमधील एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती एका स्विमिंग पूलाच्या बाजूला हटके अंदाजात दिसत आहे. यावेळी नोराच्या एका हातात मोबाईल तर दुसरा हात तिने आपल्या मानेला लावल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना नोराने आपल्या चाहत्यांसाठी तिच्यासोबत ट्रिपला येण्याची भन्नाट ऑफर दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नोराने ‘मी माझ्या पुढच्या सुट्टीचे नियोजन करत आहे. कोणाला माझ्यासोबत यायचे आहे का?’ असे विचारले आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच हॉट नोरासोबत सुट्यांचा आनंद घेण्यास चाहते तयार झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोला वेगवेगळ्या कॉमेंन्टस करत ‘क्रिएटिव्हिटीला बहर आलाय’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘माझ्या मम्मीला अगोदर विचारतो, तू ही तुझ्या मम्मीला विचारून ये’. असे म्हटले आहे. याशिवाय आणखी काही युजर्संनी ‘मला सविस्तर तपशील मेसेज करा, मी येणार आहे., ‘टेरेन्सला जॉईन व्हायचे आहे’ असे लिहिले आहे.

नोराच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे तिच्या फोटोवरुन चाहत्यांची नजर हटण्याचे नाव घेत नाही. हा फोटोला गेल्या १४ तासांत २३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा शेवटची गायक गुरु रंधावासोबत ‘नाच मेरी रानी’ गाण्यात दिसली होती. हे गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याशिवाय नोरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून आपले हॉट फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button