

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : बाजारपेठ पोलिसांनी तीन जणांकडून गावठी कट्टा जप्त केला असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील वांजोळा रोड भागात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काही संशयित पिस्तूल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून केलेल्या कारवाईत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी (एमएच.१९-डीसी.८८६०) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला, गणेश धुमाळ, हरीष भोये, उपनिरीक्षक महेश घायतड, रमण सुरळकर, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला करत आहेत.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.