जळगाव : पाच लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद | पुढारी

जळगाव : पाच लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथून पाच लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांतच तपासाचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील संतोष सुधाकर राठोड या शेतकऱ्याच्या घरी २३ जानेवारी रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ५ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत २४ जानेवारी रोजी फिर्याद दाखल करताच ग्रामीण पोलीसांनी चार दिवसात तपास करून अशोक चुनिलाल चव्हाण (वय-३२) व संदीप उर्फ सॅन्डी भिमसिंग चव्हाण (वय-२८) दोघेही रा. कृष्णा नगर ता. चाळीसगाव या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे सपोनि रमेश चव्हाण, सपोनि हर्षा जाधव, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार, गोर्धन बोरसे, पोना भुपेश वंजारी व पोना प्रेमसिंग राठोड आदींनी केली आहे. याबाबत सर्व स्तरातून ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button