स्वप्नील जोशी हा शिल्पा तुळसकरला म्हणतोय, ‘तू तेव्हा तशी’ (video)

स्वप्नील जोशी हा शिल्पा तुळसकरला म्हणतोय, ‘तू तेव्हा तशी’ (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; प्रेम आणि प्रेमकथा म्हटलं की, , आपल्यासमोर येतो तो मराठी मनोरंजन क्षेत्रामधील लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी. स्वप्नील हा लवकरच छोट्या पडद्यावरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशीसोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल १० वर्षांनी या मालिकेत दिसणार आहे. तर 'तुला पाहते रे' मध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर शिल्पा तुळसकर पुन्हा एकदा या मालिकेत चाहत्याच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.

या नवीन मालिकेबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला की, 'चाळीशी पार केलेल्या सौरभ – अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच 'तू तेव्हा तशी'. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी हि मालिका आहे. यावर्षी मी मालिका करणार असं मी ठरवलं होतं. मालिकांनी आणि टीव्ही माध्यमाच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे.'

या मालिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, 'तू तेव्हा तशी" ही गोष्ट प्रेम व्यक्त करण्याचं राहून गेलेल्या सौरभ आणि अनामिकाची आहे . सौरभला त्याचं प्रेम मिळणार की शेवटपर्यंत प्रेम करायचं राहून गेलं हीच भावना सौरभसोबत राहणार. या प्रश्नच उत्तर चाहत्यांनी लवकरच या मालिकेतून मिळणार आहे.'

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news