Parineeti Chopra ask me anything session : करण जोहर, ढुँढेगा मेरा शौहर!

पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी ‘इश्कजादे’मधून एकत्र बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर गतवर्षी ‘संदीप और पिंकी फरार’मध्येही दोघे एकत्र दिसले; पण आता परिणिती (Parineeti Chopra) अर्जुनला वैतागली असून अर्जुनचा फोननंबर डिलिट करायची इच्छा तिने व्यक्त केली आहे. तुझा आवाज अजिबात ऐकण्याच्या लायक नाही, असे तिने म्हटले आहे. नुकतेच परिने तिच्या सोशल मीडियावर फॅन्ससाठी ‘आस्क मी एनिथिंग’सेशन ठेवले होते. यात तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना बिनधास्त उत्तरे दिली. (Parineeti Chopra)
एका नेटकर्याने तिला अर्जुनबाबत काहीतरी लिही, असे म्हटले होते. त्यावर परि म्हणाली की, त्याच्यासाठी काही ओळी देखील खूप होतील. त्याचा आवाज ऐकावा असा अजिबातच नाही. त्याने कमीच बोलावे. त्याचा नंबरच डिलिट करते, अशा भावना परिणितीने व्यक्त केल्या. एकाने तिला करण जोहरबाबत काहीतरी बोल, असे विचारले तेव्हा परि म्हणाली की, भला करेगा जोहर, ढुँढेगा मेरा शौहर.