आलिया पुन्हा दिसणार ज्यु. एनटीआरसोबत | पुढारी

आलिया पुन्हा दिसणार ज्यु. एनटीआरसोबत

पुढारी ऑनलाईन

एस. एस. राजामौली यांच्या आरआरआरमध्ये भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट हीने अभिनेता ज्यूनियर एनटीआरसोबत एक तेलगु चित्रपट स्विकारला आहे. कोरताला शिवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शिवा हे ज्यूनियर एनटीआरचे मित्र आहेत. यापूर्वी दोघांनी 2016 मध्ये जनता गॅरेज हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होता.

आरआरआरमुळे आलिया आणि ज्यु. एनटीआर एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलियाचा बहुचर्चित चित्रपट गंगुबाई काठियावाडी आता 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियाने प्रथमच लेडी डॉनची भूमिका साकारली आहे.

Back to top button