BIGG BOSS 15 : सिध्दार्थच्या आठवणींने शहनाज गहिवरली (video) | पुढारी

BIGG BOSS 15 : सिध्दार्थच्या आठवणींने शहनाज गहिवरली (video)

पुढारी ऑनलाईन : अटीतटीच्या टास्कनंतर बिग बॉस १५ ( BIGG BOSS 15 ) हा शो ग्रँड फिनालेपर्यत पोहोचला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि रश्मि देसाई हे कलाकार स्पर्धक म्हणून आहेत. ग्रँड फिनालेजवळ आल्याने यामध्ये विजेता कोण होणार? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची गर्लफ्रेंड आणि शहनाज गिल बिग बॉसच्या मंचावर पोहोचली आहे.

नुकताच बिग बॉसच्या ( BIGG BOSS 15 ) घरातील शहनाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत शहनाजने दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची आठवण काढताच बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत अनेक चाहत्यांच्या डोळ्यातून पाणी आले. शहनाज सिद्धार्थची गर्लफ्रेंड होती. सिद्धार्थच्या निधनानंतर ती जास्त करून प्रकाश झोतात आली नाही. सिद्धार्थच्या जाण्याने तिला माेठा धक्का  बसला होता. परंतु, आता तिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करत पुन्हा एकदा सिद्धार्थच्या आठवणींनी उजाळा दिला आहे.

या मंचावर शहनाजने ‘मेरे दिल को पता है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यातून तिने सिद्धार्थसोबत घालवलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यातून तिने सिद्धार्थच्या आठवणीने खचून न जाता पुन्हा नव्याने मागील सर्व काही विसरून कामाला सुरूवात करणार असल्याचे सांगितले.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी, २ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. वयाच्या ४० वर्षी त्याने आत्महत्या केल्याने बॉलिवूडसह सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या धक्यातून शहनाज गिलला सावरली नव्हती. काही काळ शहनाज सोशल मीडियापासून दूर राहिली. त्यानंतर शहनाज ‘हौसला रख’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Back to top button