Sara Ali Khan : नावात काय आहे? | पुढारी

Sara Ali Khan : नावात काय आहे?

पुढारी ऑनलाईन: हा प्रश्‍न शेक्सपीयरने विचारून खूप काळ लोटला असला, तरी आता तो अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) विचारला आहे.

सारा (Sara Ali Khan) आणि विकी कौशल यांच्या आगामी एका चित्रपटाची चर्चा बर्‍याच दिवसांपासून आहे. इंदूर येथे या दोघांचे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. हे शूटिंग आता पूर्ण झाले आहे आणि त्यावर साराने सोशल मीडियात एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. आणि सर्वांचे आभार मानले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असले, तरी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे सगळीकडून चित्रपटाचे नाव काय आहे, हा प्रश्‍न वारंवार विचारला जात होता. त्यावर साराने पुढच्या पोस्टमध्ये ‘नावात काय आहे? आताच तर रॅपअप झालेय..’ असे म्हणत नावाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. काही जण या चित्रपटाचे नाव ‘लुकाछुपी 2’ असल्याचे सांगत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button