पुढारी ऑनलाईन: हॉलीवूड अभिनेता निकोलस केज ( Nicolas Cage ) याच्या चित्रपटांनी एक काळ गाजवला आहे. सध्या निकोलस त्याचे वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्याच्या पाचव्या लग्नात तो खूश आहे. आतापर्यंत त्याची चार लग्ने अयशस्वी ठरली आहेत. आता पाचवी पत्नी रिको शिबाता मात्र अत्यंत वेगळी आणि खास असल्याचे तो मानतो. मला परफेक्ट पार्टनर मिळाली आहे, असे निकोलने नुकतेच सांगितले आहे.
निकोलसच्या पाचव्या लग्नानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. कारण, निकोलसचे आणि रिको शिबाता यांच्या वयात 31 वर्षांचे अंतर आहे. 16 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी लग्न केले होते. रिकोचे वय सध्या 27 आहे, तर निकोलस 58 वर्षांचा आहे. 1995 मध्ये निकोलसने पेट्रिशिया आर्केटसोबत विवाह केला होता.
त्यानंतर 2001 मध्ये त्यांचे बिनसले. 2002 मध्ये त्याने लिसा मेरी हिच्याशी लग्न केले. तीन महिन्यांनी त्यांचा घटस्फोट झाला. 2004 मध्ये त्याने एलिस किम हिच्यासोबत लग्न केले. 2016 पर्यंत ते एकत्र होते. 2019 मध्ये त्याने एरिका कोईकेसोबत लग्न केले आणि जून 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हेही वाचलंत का?