बल्ले बल्ले! दलेर मेहंदीनं रचला इतिहास; Metaverse वर बनला पहिला भारतीय परफॉर्मर

बल्ले बल्ले! दलेर मेहंदीनं रचला इतिहास; Metaverse वर बनला पहिला भारतीय परफॉर्मर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

Metaverse या आभासी जगाची क्रेज पुढील काही दिवसांत वाढणार आहे. Metaverse वर अनेक गायक आपले इव्हेंट आयोजित करत आहेत. एका भारतीय गायकाने पहिल्यांदाच मेटाव्हर्सवर आपला कार्यक्रम सादर केला. त्याचे नाव आहे पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi). Metaverse वर कार्यक्रम सादर करणारा दलेर मेहंदी पहिला भारतीय परफॉर्मर ठरला आहे.

दलेर मेहंदीने भारताचा पहिला मेटाव्हर्स कॉन्सर्ट देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनीच्या निमित्ताने आयोजित केला होता. या कार्यक्रमाची घोषणा त्याने १७ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवरुन केली होती. Party Nite परफॉर्म करणार असल्याचे त्याने म्हटले होते. Party Nite ला भारताचा स्वतःचा मेटाव्हर्स म्हटले जात आहे. येथे युजर्स गेम खेळू शकतात. NFTs कमावू शकतात. Metaverse वेबसाइटवरील माहितीनुसार, Party Nite हे 'डिजिटल पॅरलल युनिवर्स' आहे, जे ब्लॉकचेनवर चालते.

दलेर मेहंदीने (Daler Mehndi) नमो-नमो, इंडिया-इंडिया आणि जागो इंडिया सारख्या एव्हरग्रीन हिट्सवर परफॉर्म केला. हा कार्यक्रम जगभरातील २ कोटी प्रेक्षकांनी पाहिला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी १५ लाख फॅन्सनी एकाचवेळी लॉगिंग केले. यामुळे सर्व्हर डाऊन झाला. याबद्दल दलेर मेहंदीने दिलगिरी व्यक्ती केली. "आमच्या प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी १५ लाख युजर्संनी लॉगिन केले. यामुळे तांत्रिक समस्या (technical breakdown) निर्माण झाली. याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाचा नेहमीच मला अभिमान वाटतो. एकूण २ कोटी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला." असे मेहंदीने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

दलेर मेहंदीचा देश-विदेशात मोठा फॅन फॉलॉव्हिंग आहे. 'बोलो ता रा रा, तुनक तुनक तुन, हो जायेगी बल्ले बल्ले' या सारखी त्यांची गाणी प्रचंड गाजली आहेत.

याआधी जस्टिन बीबर आणि ट्रेव्हिस स्कॉट सारख्या आंतरराष्ट्रीय गायकांनी मेटाव्हर्सवर कार्यक्रम सादर केले आहेत. याआधी तामिळनाडूमध्ये एका जोडप्याचा लग्न सोहळा मेटाव्हर्सवर आयोजित केला होता. येथे वधू-वर यांच्यासह वऱ्हाडी मंडळी अवतार रुपात सहभागी झाली होती.

मेटाव्हर्स नेमकं आहे तरी काय?

मेटाव्हर्स हे इंटरनेटच्या त्या टप्प्याचा विकास आहे; जिथे वास्तवाला आभासी स्वरूप दिले जाईल. या आभासी जगात तुमचा आणि इतर अनेकांचा आभासी अवतार असेल किंवा प्रतिकृती असतील, ज्यांच्याशी आम्ही ३D रुपात संवाद साधू. पण, मेटाव्हर्सच्या या Augmented Reality च्या जगात एकमेकांना आभासी स्वरुपात भेटण्यासाठी, आपल्याकडे व्हीआर (Virtual Reality) हेडसेट असणे आवश्यक आहे. आज, जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या मेटाव्हर्समध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. आज आपण वर्तमान जगात जसे एकमेकांना भेटतो; अशाप्रकारे मेटाव्हर्सच्या जगात आपण संवर्धित वास्तवात (Augmented Reality) एकमेकांना भेटू शकणार आहोत. या आभासी जगात आपला आणि आपल्या मित्रांचा आभासी स्वरुपात ३D अवतार (Avatars) असेल. त्यांच्याबरोबर आपण Metaverse मध्ये काहीही करू शकू, जे आपण वर्तमान जगात करू शकतो. मेटाव्हर्सवर आपण आपल्या मित्रांसोबत डिस्कोत धमाल करु शकतो. त्यांच्यासोबत आपण खेळाचा आनंद लुटू शकतो. चित्रपट पाहू शकतो. पण हे सगळे करण्यासाठी आपल्याकडे वीआर बॉक्स असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news