सामंथा आणि नागा चैतन्य विभक्त का झाले?; नागार्जुन यांनी सांगितलं कारण

सामंथा आणि नागा चैतन्य विभक्त का झाले?; नागार्जुन यांनी सांगितलं कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन (Akkineni Nagarjuna) यांनी त्यांचा मुलगा नागा चैतन्य (Akkineni Naga Chaitanya) आणि सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या घटस्फोटाविषयी मोठा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सामंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. दोघे वेगळे झाल्यानंतर अक्किनेनी नागार्जुन यांनी एका मुलाखतीत, 'सामंथाला घटस्फोट हवा होता यामुळे ती कोर्टात गेली' असे म्हटले आहे. सामंथाला नागा चैतन्यपासून घटस्फोट हवा होता. २०२१ मध्ये दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, असेही नागार्जुन यांनी नमूद केले आहे.

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही दक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी होती. ते एकमेकांपासून ऑक्टोबर २०२१ मध्ये विभक्त झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोघे एकमेकांपासून का वेग‍ळे झाले याबाबत रोज वेगवेग‍ळे खुलासे समोर आले होते.

दरम्यान, एका मुलाखतीत नागार्जुन यांना सामंथा आणि नागा विभक्त का झाले? असा प्रश्न केला होता. त्यावर नागार्जुन यांनी म्हटले की, सामंथाने पहिल्यांदा घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तिला नागा चैतन्य पासून वेगळे व्हायचे होते. तिच्या या निर्णयाचा नागा चैतन्यने आदर करत सहमती दर्शवली आणि दोघे वेगळे झाले. दोघांमध्ये कधी भांडण झाल्याचे आपण कधी पाहिले नाही. २०२१ या नवीन वर्षाचे दोघांनी आनंदाने साजरे केले होते. त्यानंतरदेखील दोघांच्या नात्यात कसलीही समस्या उद्भवली नाही. पण हे मला समजले नाही की दोघांचे नाते घटस्फोटापर्यंत कसे पोहोचले.

नागा चैतन्य घटस्फोटामुळे चिंतेत होता. त्याला सर्वांत जास्त माझी चिंता होती. मी यावर काय विचार करेन?, कुटुंबाच्या इभ्रतीचं काय होईल?, अशी त्याला चिंता सतावत होती. दोघे वेगळे होत असल्याचे ऐकून मलाही धक्का बसला. हा दोघांचा निर्णय होता. त्यांच्या या निर्णयाला विरोध न करता आम्ही तो स्वीकारला, असे नागार्जुन यांनी म्हटले आहे.

सामंथा (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Akkineni Naga Chaitanya) यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी दोघे वेगळे झाले. सामंथा आणि चैतन्य हे दोघेही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील यशस्वी कलाकार आहेत. सामंथाने तेलुगू आणि तामिळमधील अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. मॉडलिंगमधून ती चित्रपटांत आली होती. तर नागा चैतन्य दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांचा मुलगा आहे. नागा चैतन्यचे देखील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news