Mouni Roy Wedding : मौनी रॉय बनली साऊथ इंडियन ब्राईड (Photos) | पुढारी

Mouni Roy Wedding : मौनी रॉय बनली साऊथ इंडियन ब्राईड (Photos)

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार लग्नबंधनात अडकले आहेत. (Mouni Roy Wedding) दोघांच्या विवाहाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साऊथ इंडियन पध्दतीने त्यांनी लग्न केले असून हे फोटोज व्हायरल होत आहेत. (Mouni Roy Wedding)

मौनी आणि सूरज
मौनी आणि सूरज

आपल्या पतीसाठी मौनी साऊथ इंडियन ब्राईड बनली आहे. तिचा पती सूरज साऊथ इंडियन आहे. यासाठी त्याप्रमाणे रिती-रिवाजानुसार हे लग्न करण्यात आले आहे. लग्नाचे सर्व विधी मल्याळी पध्दतीने करण्यात आले आहेत. लग्नाचे जे फोटो समोर आले आहेत त्यात ती मंडपात ऑफ व्हाईट रेड बॉर्डर साडीत दिसतेय.

मौनी आणि सूरज

हा लग्नसोहळा गोवामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळींच्य़ा उपस्थितीत पार पडला. मौनीचा ब्राईड लूक खूपच सुंदर असून वधूच्या वेषात ती आकर्षक आणि छान दिसतेय. नेहमी हॉट आऊटफिटमध्ये दिसणारी छोट्या पडद्यावरची ही नागिन साईथ इंडियन वधू होऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मौनी आणि सूरज

ब्राईड लुक पूर्ण करण्यासाठी मौनीने गोल्डन ज्वेलरी घातली आहे. तर तिचा पती सूरजने धोती आणि कुर्ता घातला आहे.

मौनी आणि सूरज
मौनी आणि सूरज

मौनीने मांग टीका, माथा पट्टी, झुमके, चोकर सेट, गोल्डन कडे, कंबरपट्टा साऊथ इंडियन साडीसोबत ज्वेलरी घातली आहे. मिनिमल मेकअप, बिंदीसोबत मौनीने लुक पूर्ण केलं आहे. लग्नाच्या मंडपात मौनी आणि सूरजची अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

मौनी आणि सूरज

याआधी हळदी आणि मेंहदी सेरेमनीचे पोटो व्हायरल झाले होते. हळदीत सूरज आणि मौनीने खूप एन्जॉय केला होता. तर मेहंदीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये मौनी – सूरज एकत्र डान्स करताना दिसले होते.

मौनी आणि सूरज

त्यांच्या लग्नाला मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानी आणि मीत ब्रदर्स उपस्थित होते.

मौनी आणि सूरज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनी आणि सूरज यांची पहिली भेट २०१९ मध्ये दुबईमध्ये झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली. पण, पुढे रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर दोघांनी आपलं नातं सार्वजनिक केलं नव्हतं.

हेही वाचलं का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari pudhari.com (@pudharionline)

Back to top button