Rajeshwari Kharat : शालूचा नादचं खुळा, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये...❤️❤️😍 | पुढारी

Rajeshwari Kharat : शालूचा नादचं खुळा, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये...❤️❤️😍

पुढारी ऑनलाईन

राजेश्वरी खरात हिला फँड्री  चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मराठी चित्रपटातूनच लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शालू अर्थातचं राजेश्वरी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. तिने काही मिनिटांपूर्वीचं एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. ती लाल रंगातील ड्रेसमध्ये खूपचं सुंदर दिसते. पण, या फोटोसोबतचं तिने एक कॅप्शनदेखील दिलीय. ही कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राजेश्वरी खरातने लिहिलंय

काही दिवस वाईट दिवस असतात, एवढेच. आनंद जाणून घेण्यासाठी तुम्हाला दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मी स्वतःला आठवण करून देते की प्रत्येक दिवस चांगला दिवस जाईल असं नाही. ते तसचं आहे! ❤💯 (Some days are just bad days, that’s all. You have to experience sadness to know happiness, and I remind myself that not every day is going to be a good day, that’s just the way it is! ❤💯)

या फोटोवर तिला भरभरून कमेंट्स येताहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय-शालि चा नादच खुळा. Your hair is very pretty, what is the secret behind it?🤔😍😃😁🤗😜🤩 Lovely beauty Queen❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️. Rajeshwari tu khup chan actor ahe lavkarach Bollywood madhe entry maravi 🙏(god bless you).

या फोटो बरोबरचं दोन दिवसांपूर्वी तिने एक रिल देखील शेअर केला आहे. असा प्रकारचे रिल्स तिच्या इन्स्टावर पाहायला मिळतात. त्याचबरोबर, ती तिचे सुंदर फोटोदेखील इन्स्टावर शेअर करत असते.

राजेश्वरीने ‘फँड्री’ नंतर ‘आयटमगिरी’ या मराठी चित्रपटातून अभिनय केला. लवकरचं ती ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमोल भगत दिग्दर्शित “पुणे टू गोवा” या चित्रपटात ती दिसणार आहे. याचबरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली आहे. हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ॲक्शन रसिकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे.  या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्‍या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत यांनी दिली.

हेही वाचलं का? 

Back to top button