Flying Boat : आता येणार उडणारी नाव! | पुढारी

Flying Boat : आता येणार उडणारी नाव!

रोम : आतापर्यंत आपण पाण्यावर चालणारी नाव पाहिलेली असेल. मात्र, आता लवकरच आकाशातून उडणारी (Flying Boat) नावही पाहायला मिळेल. इटलीची एक कंपनी अशी खास ‘यॉट’ तयार करणार आहे. ही लक्झरी यॉट समुद्रावर तरंगण्याबरोबरच हवेतही उडू शकेल. या एअर यॉटची लांबी सुमारे 490 फूट असेल. कार्बन फायबरच्या सांगाड्यापासून या यॉटची निर्मिती केली जात आहे. ही यॉट ताशी 112 किलोमीटर वेगाने उडू शकेल.

या यॉटमध्ये सौरऊर्जेने चालणारे चार इलेक्ट्रिक प्रोपेलर लावण्यात आले आहेत. आकाशात उड्डाण करण्यासाठी ते मदत करतील. हेलियम वायूने भरलेले फुगेही यामध्ये लावलेले असतील. त्यामुळे आकाशात उडण्यासाठी आणि पाण्यावर तरंगण्यासाठीही मदत मिळू शकेल. हेलियमचे फुगे हवेपेक्षा हलके असतात. त्यामुळे यॉट हवेत तरंगत राहू शकेल. इलेक्ट्रिक प्रोपेलर त्याच्या उड्डाणासाठी मदत करतील.

या एअर यॉटसाठी किती खर्च येईल हे स्पष्ट झालेले नाही. सध्या जगभरातील अनेक सेलिबि—टी व अब्जाधीशांकडे खासगी नौका म्हणजेच यॉट आहेत. अशा लोकांना नजरेसमोर ठेवून या एअर यॉटचे डिझाईन बनवण्यात आले आहे. ही यॉट बनवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येऊ शकतो. सुमारे 300 फुटांचा संपूर्ण कार्बन फायबरचा सांगाडा या नौकेत असेल. तिची रुंदी 260 फूट असेल. या यॉटमध्ये दोन विशाल फुगे, हलकी बॅटरी आणि सोलर पॅनेलच्या सहाय्याने चालणारे आठ इंजिन असतील.

‘लज्जरिनी’ नावाच्या कंपनीने म्हटले आहे की ही यॉट आकाशात 60 नॉट म्हणजेच ताशी 112 किलोमीटर वेगाने उडू शकेल. Flying Boat पाच हजार फूट उंचीवरून सतत 48 तास उड्डाण करू शकेल हे विशेष!

हेही वाचा

Back to top button