

पुढारी ऑनलाईन : आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मौनी बॉयफ्रेंड सूरज नांबियारलासोबत लग्न येत्या २७ जानेवारीला लग्न करणार आहे. सध्या तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच दरम्यान मौनीने आपला फिटनेस दाखवत हॉट फोटोशूट केले आहे.
मौनी रॉयने ( Mouni Roy ) नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर यलो बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. या हॉट फोटोत ती एका रेस्टॉरंटच्या स्विमिंग पूलच्या शेजारी निवांत झोपलेली दिसत आहे. याशिवाय तिच्या बाजुला एक पुस्तक दिसत आहे. या फोटोत मौनी खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
याशिवाय तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचे मोकळे केस दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'आयुष्य म्हणजे क्षणांचा साठा आहे. क्षण आनंदाचे आहेत. मी खुपच खूश आहे.' असे तिने लिहिले आहे.
याशिवाय तिने आणखी एका सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये स्विमिंग पुलावर असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला देखील चाहत्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानेे 'खूपच सुंदर', 'हॉट' तर दुसऱ्या नेटकऱ्याने ' पुर्ण लग्नाची तयारी झाली का ?' असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजीही शेअर केला आहे.
मौनी नेहमी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून आपले अपडेट चहत्यांना शेअर करत असते. ती २७ जानेवारी २०२२ रोजी सूरज नांबियारलासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नासाठी गोव्यात फाईव्ह स्टार हॉटेल बूक केल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय तिच्या लग्नात मोजकेच कुटूंबीय हजेरी लावणार आहेत, अशीही माहिती समोर आलीय.
हेही वाचलंत का?