तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : सिड-अदितीची पहिली मकरसंक्रांत | पुढारी

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : सिड-अदितीची पहिली मकरसंक्रांत

पुढारी ऑनलाईन

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून प्रेक्षकांना एकत्र कुटुंब पद्धती आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचं दर्शन घडतं त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं कि सिड आणि अदितीचं लग्न झालं. देशमुख कुटुंब कुठलाही सण हा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करतो. सिड आणि अदितीची हि लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत देशमुखांच्या घरात अगदी उत्साहात साजरी होणार आहे.

अदिती हलव्याचे दानिगे घालून नटणार असून तिच्या सोबत देशमुख घरातील सगळे कुटुंबीय अगदी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करताना दिसतील. या खास सणाची काही खास क्षणचित्रे.

Back to top button