

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कुसुंबा येथे पतंग उडवीत असताना एका दहा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज (शुक्रवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, कुसुंबा येथे राहणारा हितेश ओंकार पाटील (वय १० वर्षे) हा शहरातील न्यू इंग्लिश मीडियम स्कुलचा विद्यार्थी होता. तो आज मकर संक्रांती निमित्त सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास पतंग उडवायला गेला होता. पतंग उडवीत असताना त्याचा पतंग विजेच्या खांबाला अडकला. यावेळी विजेचा धक्का बसून हितेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.