esha gupta होम आयसोलेशनमध्ये; बोल्ड फोटोवर खिळल्या नजरा | पुढारी

esha gupta होम आयसोलेशनमध्ये; बोल्ड फोटोवर खिळल्या नजरा

पुढारी वृत्तसेवा;  बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला ( esha gupta ) गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग झाल्याने ती होम आयसोलेशनमध्ये आहे. सध्या ईशाचा आयसोलेशनमधील एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ईशा गुप्ताने ( esha gupta ) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आपल्या घराच्या खोलीतील एका सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तर तिच्या एका बाजूला कुंडीत हिरवेगार झाडाचे रोपडे अतिशय सुंदर दिसत आहे. ईशाने फक्त यावेळी पांढऱ्या रंगाचा एक शर्ट परिधान केला आहे.

या फोटोतील खास म्हणजे, तिच्या शर्टचे बटन ओपन असून ती गाढ झोपलेली दिसून येत आहे. याशिवाय तिचा चेहरादेखील थकल्यासारखा दिसतो. या फोटोच्या कॅप्शममध्ये तिने ‘कोणत्याही प्रकारे’ असे लिहिले आहे. यावरून ईशाने कोरोना नियमांचे पालन करत असल्याचे दिसून येते.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी संमिश्र कॉमेंन्टस केल्या आहे. या फोटोतील ईशाची पोझ काहींना आवडली आहे. तर काहींना यावर एकदम वाईट कॉमेंन्ट केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘मनमोहक’, ‘सुंदर’, ‘अप्रतिम’ तर दुसऱ्या एका युजर्सने ‘कोणी घरा असे बसते का?’, ‘इतकी बोल्ड पोझ ईशाने कशी दिली?’, ‘हिला शर्टच्या बटनाचे भान नाही का?’ असे म्हटले आहे.

ईशाने गेल्या रविवारी इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. या पोस्टसोबत तिने ‘पूर्ण खबरदारी घेऊनही अखेर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या मी गृह विलगीकरणात असून, लवकरच मी यावर मात करेन,’ असे म्‍हटलं होते. याशिवाय तिने मास्क वापरा, नियमांचे पालन करा, असे आवाहन देखील चाहत्यांना केले होते. ईशा नेहमी आपले हॉट फोटो शेअर करून चाहत्यांच्या सपर्कात राहत असते.

हेही वाचलंत का?

Back to top button