गोंदिया जिल्ह्यात वाघाची शिकार; नख आणि दात गायब | पुढारी

गोंदिया जिल्ह्यात वाघाची शिकार; नख आणि दात गायब

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा 

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक १ बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वाघाचा मृतदेह आढळला आहे. वाघाचे नख आणि दात गायब असल्याने वाघाची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आज गुरुवारी सकाळी वनाधिकाऱ्यांची जंगलात पेट्रोलिंग सुरु असताना संबधित घटना उघडकीस आली. अर्जुनी मोरगावपासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत दोन किलोमीटर अंतरावर सदर घटना घडली असून मृतक वाघाचे नख आणि दात गायब आहेत. आरोपीनी शिकार कशाप्रकारे केली यादृष्टिने तपास सुरु आहे. विशेष म्हणजे ह्यापूर्वी देखील अशाच शिकारीची घटना घडली होती.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : व्हिडिओ व्हायरल! माकडाच्या मृत्यूनंतर मुंडन अन्‌ तेराव्याला भोजन, १५०० लोकांची गर्दी |

 

Back to top button