

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठमोळी मुंबईकर असलेली सोनल काळे (Sonal Kale) यांची लंडन येथील मिसेस आशिया जीबी सौदर्य स्पर्धेच्या फायनल लिस्टमध्ये निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे लंडनमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. तिच्या या निवडीबद्दल वडिल उत्तम काळे आणि आई यांनी कौतुक केले.
लंडनमध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक शिक्षण व नोकरीसाठी वास्तव्य करतात. सोनलचा (Sonal Kale) जन्म मराठी कुटुंबियांमध्ये झाला. ती सातारा जिल्ह्यातील वाई या गावची आहे. तिचे आई – वडिल हे मुंबईतील कांदिवली याठिकाणी वास्तव्याला आहेत. सन २००८ साली सोनल ही लंडन याठिकाणी उच्चशिक्षणासाठी गेली होती. ती एक इन्फ्लूएंसर, फ्रिस्टाईल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर आहे. तिने शिक्षण पुर्ण केल्यानंतर लंडनमध्येच नोकरी करत त्याच ठिकाणी स्थायिक झाली.
याप्रसंगी सोनल म्हणाली की, मी जन्माने भारतीय असून मनाने मराठी आहे. गेली १५ वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. लग्न झाल्यानंतर मी गुजराती झाले आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रीयन आणि गुजराती या दोन्हींमध्ये समन्वय ठेवते. मिसेस आशिया जीबी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्र्वास मिळवणे हा आहे. माझ्या नवीन प्रवासात मला अशा लोकांसाठी रोल मॉडेल व्हायचे आहे. ज्यांच्यामुळे नृत्य करण्याचा, स्वत:ला व्यक्त करण्याचा आत्मविश्र्वास नाही, म्हणून मी येथे मानसिक आरोग्य, प्रेम आणि दयाळूपणा या गोष्टींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आले आहे.
अधिक वाचा :