तिरूपती देवस्‍थानाकडून श्री अंबाबाईस मानाचा शालू अर्पण! (video) | पुढारी

तिरूपती देवस्‍थानाकडून श्री अंबाबाईस मानाचा शालू अर्पण! (video)

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तिरुपती देवस्थान ट्रस्ट कडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे श्री अंबाबाईस शालू सुपूर्द करण्यात आला.  

गुलाबी काठ असलेल्या राखाडी रंगाचा हा शालू आहे. या शालूची किंमत एक लाख पांच हजार सहाशे रुपये असून, हा शालू देवस्थान समितीचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सदस्य, सचिव यांच्या उपस्थितीत मंदिरात देण्यात आला.

अधिक वाचा : षष्‍ठीला करवीरनिवासिनीची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्‍वरूपात पूजा 

यावेळी भास्कर रेड्डी आमदार विश्वस्त टिटिडी, टिटिडी अध्यक्ष पत्नी सौ. लक्ष्मी रेड्डी, सौ. प्रशांती रेड्डी विश्वस्त टिटिडी, सौ. स्वर्णलता रेड्डी, सौ. सुषमा जेट्टी, सौ. जया रेड्डी आणि सौ अपर्णा रेड्डी तर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव सौ. शितल इंगवले, व्यवस्थापक धनाजी जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button