

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट 'योद्धा'साठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Sidharth Malhotra ) 'योद्धा'च्या रिलीज डेटमध्ये बदल झाला आहे, हा चित्रपट ७ जुलै, २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होती. आता रिलीज डेट वाढवण्यात आलीय. सागर आमरे आणि पुष्कर ओझा यांचे दिग्दर्शन असलेल्या 'योद्धा' मध्ये दिशा पटानी आणि राशी खन्ना मुख्ये भूमिकेत आहे. याआधीही चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आलीय. (Sidharth Malhotra )
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर नव्या रिलीज डेटची घोषणा केलीय. तरण आदर्श यांनी म्हटलंय-सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्नाच्या 'योद्धा' चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आलीय. आता हा चित्रपट १५ सप्टेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.