

पुढारी ऑनलाईन डेस्क: आकाशगंगेतील ताऱ्यांचा सर्वात जुना समूह मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ॲस्ट्रॉनॉमी (जर्मनी) येथील संशोधन टीमने शोधला आहे. अभ्यास सह-लेखक ख्याती मल्हान यांनी दोन जुन्या आकाशगंगा रचनांना 'शक्ती' आणि 'शिव' अशी नावे दिली आहेत. या दोन्ही आकाशगंगा (ताऱ्यांचा समूह) १२-१३ अब्ज वर्षे जुने असल्याचे देखील प्रकाशित केलेल्या संशोधनात म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'सायन्स न्यूज'ने दिले आहे. (Shiva-Shakti Star Groups)
संशोधनानुसार, खगोलशास्त्रज्ञांनी ताऱ्यांचे दोन प्राचीन प्रवाह शोधून काढले आहेत. हे आकाशगंगेच्या निर्मिती दरम्यानचे हे दोन ताऱ्यांचे समूह असू शकतात. हे ताऱ्यांचे समूह तेव्हा निर्माण झाले आहेत, जेव्हा आकाशगंगेतून ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती. आकाशगंगेतील ताऱ्यांच्या या समूहांना 'शक्ती' आणि 'शिव' अशी हिंदू देवतांची नावे देण्यात आली आहेत. (Shiva-Shakti Star Groups)
खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या आकाशगंगेतील या दोन्ही संरचना सुमारे १२ अब्ज वर्षांपूर्वीच्या आहेत. या दोन भिन्न आकाशगंगांचे एकत्रिकरण असू शकतात, असे देखील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 'द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल'मध्ये या संदर्भातील संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. (Shiva-Shakti Star Groups)
संशोधकांनी अभ्यासात नमूद केले आहे की, शक्ती आणि शिव हे सुरुवातीच्या मोठ्या तारा समूहांचे प्रतिनिधित्व करतात जे सुमारे 12 गिगा वर्षांपूर्वी तयार झाले असावेत. एका गिगावर्षात एक अब्ज वर्षे असतात. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ॲस्ट्रॉनॉमीचे अभ्यास सह-लेखक हंस-वॉल्टर रिक्स म्हणाले की, शक्ती आणि शिव हे आकाशगंगेच्या केंद्रात सामील होणारे पहिले दोन सदस्य असू शकतात, ज्यामुळे मोठी आकाशगंगा तयार होण्यास मदत झाली असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
'स्टार क्लस्टर'च्या अभ्यासात संशोधकांना असे देखील आढळून आले आहे की, दोन स्वतंत्र आकाशगंगांनी बनलेल्या शक्ती आणि शिव ताऱ्यांचा वेग आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ताऱ्यांपेक्षा जास्त आहे. तसेच या सर्व ताऱ्यांमध्ये धातूचे प्रमाण देखील कमी होते, यावरून याची निर्मिती फार वर्षांपूर्वी झाल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, नुकत्याच तयार झालेल्या ताऱ्यांमध्ये जास्त जड धातू घटक असतात.
हेही वाचा: