छोट्या आकाशगंगांना गिळून वाढतेय ‘मिल्की वे’ | पुढारी

छोट्या आकाशगंगांना गिळून वाढतेय ‘मिल्की वे’

वॉशिंग्टन : आपली ग्रहमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे तिला ‘मिल्की वे’ असे नाव आहे. ही सर्पिलाकार आकाशगंगा अंतराळातील अन्य काही छोट्या आकाराच्या आकाशगंगांना सामावून घेत स्वतःचा विस्तार करीत आहे असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ‘डार्क मॅटर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या अद़ृश्य अशा घटकांमुळे हा विस्तार घडत आहे.

‘बिग बँग’ नावाने ओळखल्या जाणार्‍या महाविस्फोटानंतर अनेक आकाशगंगा निर्माण झाल्या. या आकाशगंगा इतर आकाशगंगांना धडकून व दोन आकाशगंगांचा एकमेकींमध्ये मिलाफ होऊन त्यांचा आकार वाढत राहिला. आपल्या आकाशगंगेचाही आकार अशाच पदद्धतीने वाढत आहे.

याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ कॉस्मोलॉजी अँड एस्ट्रोपार्टिकल फिजिक्स’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सातत्याने नव्या आकाशगंगांना सामावून घेत असल्याने आकाशगंगेचा विस्तार वाढत राहतो असे त्यामध्ये म्हटले आहे. कोपेनहेगन युनिव्हर्सिटीतील जान एम्बिजोर्न यांनी याबाबतची माहिती दिली. एका स्टँडर्ड कॉस्मोलॉजिकल मॉडेलचा वापर करून याबाबतचे एक नवे संशोधन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button