Galaxy : ‘मेसीज’ आकाशगंगा आहे ब्रह्मांडातील सर्वात जुना घटक

Galaxy : ‘मेसीज’ आकाशगंगा आहे ब्रह्मांडातील सर्वात जुना घटक

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील एका भाग्यवान 'बर्थडे गर्ल'चे नाव ज्या दूरस्थ प्रकाशाला दिले आहे (Galaxy) तो प्रकाश एका आकाशगंगेतून येत होता. या आकाशगंगेला 'मेसीज गॅलेक्सी' असे नाव आहे. ही आकाशगंगा ब्रह्मांडातील सर्वात जुन्या घटकांपैकी एक असल्याचे आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने संशोधकांनी स्पष्ट केले आहे. 'बिग बँग' या महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली असे मानले जाते. या घटनेनंतर केवळ 40 कोटी वर्षांनंतर ही आकाशगंगा बनली होती. आतापर्यंत शोधण्यात आलेल्या सर्वात जुन्या अशा चार आकाशगंगांपैकी ही एक आहे.

'मेसीज गॅलेक्सी'ला (Galaxy) हे नाव प्रमुख संशोधक स्टीव्हन फिंकलस्टेन यांच्या कन्येवरून देण्यात आले आहे. गेल्यावर्षी या आकाशगंगेचा शोध लागला त्यावेळी तिचा वाढदिवस होता. या आकाशगंगेने 13 अब्ज वर्षांपूर्वी प्रकाश उत्सर्जन करण्यास सुरुवात केली होती. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. 'स्पेक्ट्रोस्कोपी' या तंत्राने ज्या आकाशगंगा सर्वात जुन्या ठरवण्यात आल्या आहेत, अशा चार आकाशगंगांमध्ये तिचा समावेश आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शोधलेली ही सर्वात दूरवरची आकाशगंगा आहे. शिवाय स्पेक्ट्रोस्कोपीने पुष्टी केलेलीही ती पहिलीच आकाशगंगा आहे, असे टेक्सास युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक फिंकलस्टेन यांनी म्हटले आहे. या आकाशगंगेचा ऑगस्ट 2022 मध्ये सर्वप्रथम छडा लावण्यात आला होता.

-हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news