

पुणे : पुण्यात शिवाजीगर येथील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. पुणे मेट्रोमध्ये महाराष्ट्रातील मुला-मुलींना नोकरीसाठी संधी देण्यात यावी.
तसेच रूबी हॉल मेट्रो स्थानकाला माता रमाई आंबेडकर, शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज त्याबरोबरच मंगळवार पेठ मेट्रो स्थानकाला छत्रपती शाहू महाराज मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा