Har Ghar Tiranga | जम्मू- काश्मीर : तिरंग्याच्या रंगात उजळला गणपत पूल (व्हिडिओ) | पुढारी

Har Ghar Tiranga | जम्मू- काश्मीर : तिरंग्याच्या रंगात उजळला गणपत पूल (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीनगरमधील निमलष्करी दलाच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF)  लाल चौकात तिरंगा बाईक परेड केली. केंद्रीय राखीव पोलीस दलाने  ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी ‘तिरंगा बाइक रॅली’चे आयोजन केले होते. श्रीनगरमधील दोडा येथील गणपत पूल तिरंग्यात उजळून निघाला होता. (Har Ghar Tiranga)

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 15 ऑगस्टपर्यंत

स्वातंत्र्याची स्मृती तेवत राहावी, जनतेच्या मनातील स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी, दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. या दरम्यान ध्वजसंहितेचे पालन करा, कागदी व प्लास्टिक झेंडे वापरू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा 

Back to top button