

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कोची येथे एका चोवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे या युवकाने जीव गमावला या युवकाने एका स्थानिक हॉटेलमधून शोरमा हा पदार्थ खाल्ला होता. त्यानंतर विषबाधा झाल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. Death after eating shawarma
मृत युवकाचे नाव राहुल डी. नायर असे आहे. शनिवारी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहुल येथील विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत होता. त्याने ले हयात या हॉटेलमधून शोरमा मागवून खाल्ला होता. शोरमा खाल्ल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशीची त्रास सुरू झाला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण काही अवयवय निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. Death after eating shawarma
पोलिसांनी या प्रकरणात हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तसेच या हॉटेलमधील शोरमा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तर राहुल उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलने अन्नातून विषबाधा झाल्याचा अहवाल दिलेला आहे.
शोरमामधून विषबाधा होऊन मृत्यू होण्याची केरळमधील या वर्षातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी कोट्टायाम येथील एका नर्सचा शोरमा खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. तर मे २०२२मध्ये कासरागोड जिल्ह्यात एका १९ वर्षांच्या युवतीचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता, असे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
हेही वाचा