Share Market Updates | शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी कायम, सेन्सेक्स ६३,२८४ वर बंद

Share Market Updates | शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी कायम, सेन्सेक्स ६३,२८४ वर बंद
Published on
Updated on

Share Market Updates : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीचा तेजीचा उच्चांक गुरुवारी (दि.१ डिसेंबर) कायम राहिला. आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० हून अधिक अंकांनी वाढून ६३,५०० वर निफ्टी १०० अंकांनी वाढून १८,८०० वर गेला होता. दोन्ही निर्देशांकांचा हा नवा उच्चांक आहे. त्यानंतर सेन्सेक्स १८४ अंकांच्या वाढीसह ६३,२८४ वर बंद झाला. तर निफ्टी ४२ अंकांनी वाढून १८,८०० वर बंद झाला.

अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर्स हा निफ्टीवर सर्वाधिक वाढला. हा शेअर २.८४ टक्क्यांनी वाढून ७,२७८ रुपयांवर बंद झाला. हिंदाल्को, टाटा स्टील, ग्रासिम, टीसीएस हे शेअर्सही वधारले. याउलट आयसीआयसीआय बँक, यूपीएल, सिप्ला, आयशर मोटर्स आणि बजाज ऑटो शेअर्स घसरले.

हे शेअर्स तेजीत….

HDFC बँकेचा शेअर १.२३ टक्क्यांनी वाढून १,६२८ रुपयांवर पोहोचला. टेक महिंद्राचा शेअर १.९८ टक्क्यांनी वाढून १,०९८ रुपयांवर पोहोचला. एचसीएल टेक्नॉलॉजीजचा शेअर १.२६ टक्क्यांनी वाढून १,१३४.९० रुपयांवर गेला. विप्रोच्या शेअरने १.३० टक्क्यांनी वाढून ४१२.२५ रुपयांवर व्यवहार केला. इन्फोसिसचा शेअर १.६० टक्क्यांनी वाढून १,६५८.५० रुपयांवर पोहोचला. L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर ९.०९ टक्क्यांनी वाढून ४,१६० रुपयांवर गेला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज ०.२० टक्क्यांनी वाढून २,७३९ वर व्यवहार केला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मध्यवर्ती बँक लवकरच व्याजदर वाढीची गती कमी करू शकते असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख निर्देशाकांनी उसळी घेतली. यामुळे आशियाई शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. भारतीय शेअर बाजारातही सलग आठव्या दिवशी तेजी कायम राहिली.

दरम्यान, जपानचा निक्केई १.०६ टक्क्यांनी वधारला आहे. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४९ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.९१ टक्क्यांनी वाढला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १.७४ टक्क्यांनी वाढला. अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांकांनी उसळी घेतली. (Share Market Updates)

जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील भारताची आर्थिक वाढ ६.३ टक्के आहे, जी मागील तीन महिन्यांतील १३.५ टक्के वाढीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. देशातील आर्थिक वाढीची गती मंद झाल्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
NSE आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ९,०१० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ४,०५६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news