

Share Market Closing : आशियासह जागतिक बाजारातील कमकुवत संकेत मागे टाकेत भारतीय शेअर बाजाराने आज बुधवारी (दि.५) उसळी घेतली. फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या मजबूत तिमाही कमाईच्या जोरावर आज दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजीत राहिले. हेविवेट एचडीएफसी आणि बजाज शेअर्समधील जोरदार खरेदीच्या जोरावर आज सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह खुले झाले होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी वाढून ५९,४०० वर होता. तर निफ्टी १७,५०० च्या जवळ होता. त्यानंतर सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला. बाजार बंद होईपर्यंत ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ५८२ अंकांच्या वाढीसह ५९,६८९ वर बंद झाला. तर निफ्टी १५९ अंकांनी वाढून १७,५५७ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात IT, फायनान्सियल आणि रिअल्टी निर्देशांक १ टक्क्याने वाढला. तर ऑटो शेअर्स घसरले.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सेन्सेक्सने गेल्या ४ दिवसांत सुमारे २ हजार अंकांची वाढ नोंदवली आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा फायदा झाला आहे. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६०.९६ लाख कोटींवर पोहोचले आहे.
३० कंपन्या सूचीबद्ध असलेला अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक खाली आल्याने आशियाई बाजारातही त्याचे पडसाद उमटले. जपानचा निक्केई १.७ टक्क्यांनी घसरला. पण भारतीय बाजारात तेजी राहिली.
३१ मार्चपर्यंत ठेवींमध्ये वार्षिक २०.८ टक्के वाढ नोंदवल्यानंतर HDFC बँकेचे शेअर १.५ टक्क्याने वाढले. तर बजाज फायनान्सचे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत वधारले. आजच्या व्यवहारात हा शेअर आज ५,९३७ रुपयांवर पोहोचला. बिगरबँकिंग वित्तीय संस्था असलेल्या (NBFC) बजाज फायनान्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २९.६ दशलक्ष एवढी सर्वाधिक नवीन कर्जे बुक केल्याने त्यांचे शेअर्स वाढले.
बाजारात आज तेजी असतानाही ऑटो स्टॉक्समध्ये आज घसरण दिसून आली. अशोक लेलँड (-२.५९ टक्के), Escorts Kubota (-१.३९ टक्के), आयशर मोटर्स (-२.०७ टक्के), मारुती सुझूकी (-०.५६ टक्के), टाटा मोटर्स (-०.४५ टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (-.०३९ टक्के) हे शेअर्स घसरले. (Share Market Closing)
दुपारच्या सत्रात सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक (२.५७ टक्के वाढ), इन्फोसिस (१.०६ टक्के वाढ), एचडीएफसी (२.३९ टक्के वाढ), टीसीएस (१.४३ टक्के वाढ), बजाज फायनान्स (१.१७ टक्के वाढ), टीसीएस (१.८४ टक्के वाढ), टायटन (१.३९ टक्के वाढ) हे शेअर्स वाढले होते. तर निफ्टीवर एचडीएफसी बँक, एचडीएफसी लार्सेन, आयटीसी, टीसीएस हे शेअर्स तेजीत राहिले. सेन्सेक्सवर रिलायन्स, आयसीआयसीआय, एसबीआय, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले होते.
IT मधील Cyient, एल अँड टी, टाटा कन्सल्टंसी, MphasiS, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीस हे शेअर्स तेजीत राहिले.
अदानी समूहाच्या शेअर्सनी आज स्थिर पातळीवर व्यवहार केला. अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही हे शेअर्स काही प्रमाणात वाढले. तर अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट यात घसरले होते.
NSDL डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मार्चमध्ये ७,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. सोमवारी FII नी ३२२ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
अमेरिकन डॉलर इंडेक्स १०१.४३ या दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवर गेल्यानंतर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज २० पैशांनी मजबूत झाला. आज सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.१८ वर होता. आता गुंतवणूकदारांचे लक्ष उद्या जाहीर होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण निर्णयाकडे लागले आहे. आरबीआय यावेळी २५ बेसिस पॉइंट्सने रेपो रेट वाढविण्याची शक्यता आहे. (Share Market Closing)
हे ही वाचा :